अमरावती महानगरपालिका, अमरावती
झोपडपट्टी पुनर्वसन विभाग
Satyamev Jayate
अर्ज भरण्याची पद्धत

  झोपडपट्टी सर्वेक्षण अर्ज — भरण्याची पद्धत

अमरावती महानगरपालिका, अमरावती

वैयक्तिक माहिती
पत्ता व स्थान
घराचे तपशील
कुटुंब माहिती
पात्रता तपासणी
कागदपत्रे
महत्त्वाची सूचना : * चिन्ह असलेली सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर त्याच आधार कार्ड क्रमांकावर पुन्हा अर्ज भरता येणार नाही. कृपया सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
  भाग १ : (वैयक्तिक माहिती) — (प्र. क्र. १ ते ९)
1
मुख्य सदस्याचे नाव *

घरातल्या मुख्य सदस्याचे संपूर्ण नाव टाकावे. हेच नाव अर्जावर नोंदवले जाईल.

2
वडिलांचे / पतीचे नाव *

अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे पूर्ण नाव टाकावे.

3
PMAY-U ऑनलाईन अर्ज क्रमांक *

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अर्ज केला असल्यास त्याचा ऑनलाईन अर्ज क्रमांक येथे टाकावा.

4
लिंग *

खालीलपैकी एक पर्याय निवडावा :

पुरुष स्त्री इतर
5
धर्म *

अर्जदाराचा धर्म ड्रॉपडाउन मधून निवडावा.

6
जात *

अर्जदाराची जात निवडावी. हे जातवर्गीकरण (SC / ST / NT / OBC / General) निर्धारित करण्यासाठी आवश्यक आहे.

7
वार्षिक उत्पन्न (रु.) *

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अंकात टाकावे (उदा. 250000).

8
वैवाहिक स्थिती *

अर्जदाराची वैवाहिक स्थिती ड्रॉपडाउन मधून निवडावी.

9
अर्जदाराचा प्रकार *

अर्जदाराचा प्रकार (उदा. सामान्य / दिव्यांग (अपंग) / विधवा / ज्येष्ठ नागरिक / तृतीयपंथी / माजी सैनिक) निवडावा.

मोबाईल क्रमांक

अर्जदाराचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकावा.

  भाग २ : (पत्ता व स्थान) — (प्र. क्र. १०)
10
पत्ता *

सध्याचा संपूर्ण पत्ता टाकावा. खालील सर्व उप-फील्ड भरणे अनिवार्य आहे :

झोन (10a) प्रभाग (10b) घर क्र. (11) शहर (12) मतदार संघ (13)
झोपडपट्टी व मोहल्लाचे नाव

तुम्ही राहत असलेल्या झोपडपट्टी किंवा मोहल्ल्याचे नाव ड्रॉपडाउनमधून निवडा. जर नाव उपलब्ध नसेल, तर "इतर" हा पर्याय निवडा आणि त्याखालील "झोपडपट्टी/मोहल्ल्याचे नाव" या रकान्यात नाव प्रविष्ट करा.

  भाग ३ : (घराचे तपशील) — (प्र. क्र. १४ ते १७)
14
घर प्रकार *

घराचा प्रकार ड्रॉपडाउन मधून निवडावा (उदा. पक्के / कच्चे / अर्ध-पक्के).

15
घरात वाणिज्य प्रयोजन आहे का ? *

जर घराचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असेल, तर व्यवसायाचा प्रकार निवडा. जर संबंधित व्यवसायाचा प्रकार यादीमध्ये उपलब्ध नसेल, तर "इतर" हा पर्याय निवडा. घराचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत नसल्यास "नाही" हा पर्याय निवडा.

16
जागेचे व बांधकामाचे क्षेत्रफळ *
जागेचे क्षेत्रफळ (चौ.मी. / चौ.फूट)
17
जागेची सीमा *

जागेच्या चारही बाजूंची सीमा (शेजारी काय आहे) टाकावी (उदा. रस्ता / सर्विस लाईन).

उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम
  भाग ४ : (कुटुंबाची माहिती) — (प्र. क्र. १८)
18
कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती *

कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी खालील माहिती भरावी. एकापेक्षा जास्त सदस्य असल्यास "कुटुंब सदस्य जोडा" या बटणावर क्लिक करा :

सदस्याचे नाव * लिंग * वय * नाते * आधार क्र. *
पूर्ण नाव टाकावे पुरुष / स्त्री / इतर वय अंकात नाते निवडावे 12 अंकी आधार क्र.
प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक अनिवार्य आहे. एकाच आधार क्रमांकावर दोनदा अर्ज भरता येणार नाही.
  भाग ५ : (पात्रता तपासणी) — (प्र. क्र. १९ ते २३)
19
स्वतःच्या मालकीची जागा / घर *

भारतात कुठेही स्वतःच्या मालकीची जागा किंवा घर आहे का ? होय / नाही निवडावे.

20
झोपडपट्टी रहिवासी — कोणत्या वर्षापासून ? *

या झोपडपट्टी क्षेत्रात कोणत्या वर्षापासून राहत आहात ते वर्ष निवडावे.

21
रहिवासी असल्याचा सादर केलेला पुरावा *

रहिवासी असल्याचे सिद्ध करणारा कागदपत्राचा प्रकार निवडावा (उदा. वीज बिल, मतदार ओळखपत्र इ.).

22
सध्या स्थितीत रहिवासी असल्याचा पुरावा (चालू वर्षाची महानगरपालिका कर भरणा पावती) *

सध्या त्याच ठिकाणी राहत असल्याचा पुरावा आहे का ? होय / नाही निवडावे.

23
महाराष्ट्रात अतिक्रमण नियमानुकूल योजनेचा पूर्वी लाभ *

यापूर्वी महाराष्ट्रात कुठे अतिक्रमण नियमानुकूल योजनेचा लाभ घेतला असल्यास होय निवडावे.

  भाग ६ : (सुविधा उपलब्धता) — (प्र. क्र. २४ ते २७) [होय / नाही निवडावे]
२४. वीज पुरवठा २५. पाणीपुरवठा २६. सर्व्हिस लाईन २७. रस्ता
28
इतर आवश्यक माहिती

अर्जदाराला अतिरिक्त माहिती सांगायची असल्यास येथे टाकावी. (अनिवार्य नाही)

  भाग ७ : (कागदपत्रे अपलोड करावी)

खालील सर्व कागदपत्रे अनिवार्य आहेत. कागदपत्रांची PDF फाईल तयार करताना सर्व एकाच PDF मध्ये ठेवावीत. PDF फाईलची साईज 10 MB पेक्षा जास्त नसावी.

  • A) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो (.JPEG / .JPG फॉर्मेट — कमाल 100 KB) * अनिवार्य
  • B) अर्जदाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली .JPEG / .JPG फॉर्मेट — कमाल 100 KB) * अनिवार्य
  • C) रहिवासी पुराव्याचे कागदपत्र (प्र. २२ मध्ये नमूद केलेले — PDF स्वरूपात) * अनिवार्य
  • D) आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांचे — एकाच PDF मध्ये) * अनिवार्य
  • E) इतर आवश्यक कागदपत्रे (जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र इ. लागू असल्यास) लागू असल्यास
फाईल अपलोड मर्यादा : फोटो — कमाल 300 KB | कागदपत्रे PDF — कमाल 10 MB | सर्व कागदपत्रांची एकच PDF फाईल तयार करावी.
  भाग ८ : (अर्ज पूर्ण करण्याची अंतिम प्रक्रिया)
फोटो व कागदपत्रे अपलोड करणे

अर्ज साठवल्यानंतर फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावी. हे अपलोड केल्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नाही.

अर्ज साठवणे

सर्व माहिती भरून झाल्यावर "साठवणे" बटणावर क्लिक करावे. माहिती आपोआप तपासली जाईल.

पोच पावती प्रिंट करावी

अर्ज पूर्ण झाल्यावर पोच पावती (Acknowledgement) प्रिंट काढून भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावी.